जळगाव शहरातील दिनकर नगर परिसरात राहणारी १९ वर्षीय तरुणी हेमांगी पंकज सोनवणे ही बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ती कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघाली, परंतु त्यानंतर ती परतलीच नाही. याप्रकरणी रात्री १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.