कोरची-कुरखेडा मार्गावरील बेडगाव घाट परिसरात वाहनधारकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडगाव घाटातील मोठ्या चढावर उजव्या बाजूच्या पायवाट रस्त्याजवळील झुडपाखाली बिबट्या निवांत बसलेला दिसला. त्या वेळेस घाटातून अनेक दुचाकीस्वार जंगलात बांबू वास्ते (वास्त्याचे काठ्या) तोडण्यासाठीं जात होते. परंतु त्या परिसरात बिबट्याची उपस्थिती लक्षात घेता अशा प्रकारे जीव धोक्यात घालून जंगलात प्रवेश करणे धोकादायक ठरु शकते, असे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले.