बुलढाणा, अकोला व अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सिमेवर बांधलेल्या भैरवगड हनुमान सागरात ९०.८४ टक्के जलसाठा झाला आहे. पाण्याची आवक पाहता धरणाचे दोन गेट ५० सेंमीने उघडण्यात आले असून, त्याद्वारे वान नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.सातपुडा परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने १ सप्टेंबर रोजी दोन गेट उघडण्यात आले. वान नदीत ८२.७३ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.