धुळे तालुक्यातील शिरूड शिवारात शेतातील पिकांवर औषध फवारणी करणे एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतले आहे. फवारणीचे औषध नाका-तोंडात गेल्याने विषबाधा होऊन राजधर विक्रम भिल (वय ५५, रा. शिरूड) या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.