बुलढाणा शहरातील सहकार विद्या मंदिर येथे 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते विजयी व उपविजेता संघांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरव केला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नवलकर, बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकेश झंवर, कोमलताई झंवर, जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर आदी उपस्थित होते.