गहाळ मोबाईल शोधण्यात संगमनेर पोलिसांचा कमाल! २० मोबाईल परत मालकांच्या हाती संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षम कारवाईतून गेल्या वर्षभरात गहाळ झालेले तब्बल २० महागडे मोबाईल फोन पुन्हा मूळ मालकांच्या ताब्यात परत आले आहेत. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व अत्याधुनिक पोर्टलचा वापर करून हे मोबाईल शोधून काढले. या मोबाईलची एकूण किंमत ३ लाख ९६ हजार रुपये एवढी असून, आज संध्याकाळी पाच वाजता आयोजित पत्रकार परिषदेत मोबाईल मालकांना सुपूर्द आज सायंकाळी पाच वाजता करण्यात आले.