संगमनेरात धक्कादायक घटना : इंदिरानगर मध्ये पतीने पत्नीचा खून करून केली आत्महत्या संगमनेर इंदिरानगर भागात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये कुलदीप सुनील अडांगळे (वय ३५) आणि वैष्णवी संजय खांबेकर (वय २२) यांचा समावेश आहे. माहितीप्रमाणे, दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होते. वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे वैष्णवी दीड महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली होती.