नागरिकांच्या तक्रारी, अडचणी व समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन पार पडला. या उपक्रमात विविध प्रभागांतील नागरिकांनी थेट प्रशासनाशी संवाद साधून आपापल्या समस्या मांडल्या.