सांगोला तालुक्यातील करांडेवाडीत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्यावर व बहिणीवर कोयत्याने वार करून जखमी केले. त्याने एवढ्यावरच न थांबता आईला आणि बहिणीला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत, रुक्मिणी गोरख करांडे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी रावसाहेब गोरख करांडे (रा. करांडेवाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.