गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असताना मुंबई–गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील वेरळ, आवाशी आणि परशुराम घाट या भागात भीषण वाहतूक कोंडीची समस्या उभी राहिली आहे. या मार्गावरील अपूर्ण कामे, खड्डे, तुटलेल्या पट्ट्या आणि एकेरी रस्त्यावरून सुरू असलेली वाहतूक यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वेरळ आणि आवाशी येथे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत पुलांचे काम सुरू असून ते अद्याप पूर्णत्वाला गेलेले नाही. परिणामी, एकाच लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे.