शहरात मारबतीची मिरवणूक गणेशनगर येथून काढण्यात आली, शहरातील अनेक भागातून मारबतीची मिरवणूक डिजे वाजवत काढण्यात आली.यावेळी राई, रुई, ढेकुल मोगसा, घेऊन जागे मारबतच्या जल्लोषात मारबतीची मिरवणूक शहरातील अनेक ठिकाणी काढण्यात आली.यावेळी अनेक देखावे पाहायला मिळाले. तर कुठे 100 वर्ष तर कुठे ६५ वर्ष पूर्ण झालेल्या मारबतीची मिरवणूक करण्यात आली. कुठे काळी तर कुठे पिवळी तर कुठे केसरी रंगाची मारबतीची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी युवकांनी मोठ्या संख्येने मारबतीसोबत डीजेच्या तालावर नाचत होते.