हिंगणघाट शहरातील केंद्र सरकार पुरस्कृत रावबहादुर बन्सीलाल अभिरचंद, डागा मिल (गिरणी) सुरू करा. यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री मा. ना. पंकज भोयर यांनी विशेष लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.त्यांनी मागणी केली आहे की हिंगणघाट शहर हे वर्धा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर आहे. व ते कामगारांचे शहर म्हणून त्यांची ओळख आहे.