डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पसरलेले घाणीचे साम्राज्य नगर परिषदेने साप न केल्यास नगरपरिषदेवर लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आझाद समाज पार्टीच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. यावेळी आझाद समाज पार्टी कडून येथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. ना नाल्या,ना पाण्याचा निचरा करण्यासाठी नाल्या, ना रस्ते, घराच्या सभोवताल कचऱ्याचे ढीग त्यामुळे पसरणारी दुर्गंधी ,दुषीत वातावरण. पावसाळ्यात होणाऱ्या रोगराईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे.