केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे दिनांक 13 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री संत गजानन महाराज नगरी शेगाव येथे आयोजित माऊली पर्व 2025 या राष्ट्रीय आयुर्वेद संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती, सकाळी 11 : 30 वाजता गोंडगाव तालुका शेगाव येथील रामेश्वर धारकर यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील.