हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात रोड रस्त्याचे कामे सुरू असून या रस्त्याच्या कडेला असलेल्या खाली जागेवर सिमेंटीकर करण करण्यात येत आहे.मात्र यामुळे शहरात पाणी मुरण्यासाठी व रस्त्याच्या कडेला जागा शिल्लक राहत नसल्याने पर्यावरण संवर्धन संस्था आक्रमण झाली असून यासंबंधी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्वरित हे सिमेंट करण थांबविण्याची मागणी केली असून वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरण संरक्षण समितीचे आशिष भोयर यांनी दिला आहे.