साकोलीतील मामा मशिनरी दुकानासमोर ठेवलेल्या इकोस्पोर्ट कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील बॅग काढून त्यातील1लाख50हजार200रुपये लंपास केले.ही घटना सोमवार दि.8सप्टेंबरला रात्री7.30ला घडली आहे.मामा मशिनरीचे मालक विनोद साखरवाडे यांनी केलेल्या तक्रारीवरून साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसाच्या हाती लागला आहे.ही माहिती भंडारा जिल्हा पोलीस वार्तापत्राद्वारे मंगळवार दि9सप्टेंबरला सायंकाळी6वाजता देण्यात आली. या धाडसी चोरीमुळे नागरिकांना भीती पसरली आहे