शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर ८ ते २५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अकाऊटंटला ६३ लाख ९३ हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणात पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी पुण्यातील दोघांना अटक केली आहे.प्रथमेश शिवाजी भुसे (वय २३, रा. अहिल्यानगर, लोहगाव) व त्याचा साथीदार सचिन राधाकिसन मोरे(वय ३४) अशी आरोपींची नावे आहे