आज दिनांक आठ स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ₹5,28,560 किमतीची देशी दारू आणि एक हुंदाई ग्रँड आय10 चारचाकी कार जप्त केली. या प्रकरणात पोलिसांनी ईश्वर शामलाल जैस्वाल (वय 43, रा. चिंचोली लिंबाजी) याला ताब्यात घेतले आहे.कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण 96 काचेच्या बाटल्या, 300 प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या, 12 मोठ्या काचेच्या बाटल्या आणि चारचाकी वाहन असा मुद्देमाल हस्तगत केला.