आज सहा सप्टेंबर रोजी अमरावती शहरातील साईनगर येथील अकोली रोडवर असलेल्या शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे आज नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अतिशय छोट्या मुलांचे हे कार्यक्रम होते यात मोठ्या उत्साहात बालगोपालांनी सहभाग घेतला तर लहानग्यांनी सर्व प्रेक्षकांची मने जिंकली एकीकडे मोबाईलचे वेड लागले असताना मंडळांनी या नृत्य कार्यक्रमाकडे मुलांची ओढ निर्माण केली आहे यात चारवी अमोल भटकर हीने अतिशय सुंदर नृत्य केले आहे.