मी कोणत्याही निवडणुकीला उमेदवार म्हणून उभा राहणार नसून यापूर्वीच राजकीय संन्यास घोषित केला आहे. मात्र कोणता उमेद्वार निवडून आणायचा हे आपणच ठरवू असे सूचक वक्तव्य जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ मा.सदस्य बांधकाम सभापती अॅड सुभाष पाटील यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे उंबरे-वांबोरी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.आज शनिवारी दुपारी उंबरे येथे त्यांनी हे वक्तव्य केले आहे.