मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० च्या सुमारास तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी पर्यवेक्षीय, अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्राम रोजगार सहायक यांची तालुकास्तरीय कार्यशाळा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह पंचायत समिती महाड येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले देखील उपस्थितीत होते. यावेळी संबंधित अधिकारी आणि मान्यवरांचे उपस्थितांना समृद्ध ग्रामपंचायत बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.