22 ऑगस्ट ला रात्री दहा वाजताच्या दरम्यान खापरखेडा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दर्शन वाडी लॉन येथे सुरू असलेल्या जुकारावर छापा मार कार्यवाही केली. घटनास्थळावरून सहा दुचाकी वाहन रोख रक्कम एक चार चाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण सहा लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी आशिष कासमगोतरे, अलंकार कावळे, सच्चिदानंद ढबळे यांच्याविरुद्ध खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे