ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये घेऊन यावेत, यासाठी दहिवली (ता. माढा) येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पतीसह सासू व सासऱ्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी पती नारायण विलास मिस्किन, सासरा विलास रामचंद्र मिस्किन व सासू शोभा विलास मिस्किन (रा. दहीवली, ता. माढा) अशी त्यांची नावे आहेत. काजल नारायण मिस्किन (वय २५, रा. दहीवली) या विवाहितेने २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता दहिवली येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वडिलांनी फिर्याद दिली आहे.