हिंगोलीच्या कयाधू नदी पात्राला पूर आलेला असताना बघायला गेलेल्या युवकाचा पाय घसरून पुराच्या पाण्यात पडून वाहून गेलेल्या युवकाचा आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी अकरा वाजता दरम्यान अखेर तिसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या व नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्ह्यात 29 ऑगस्ट रोजी मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला होता.