देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील संविधान चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या घटनेचा निषेध करत, लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरील हा हल्ला असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. अनिल देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊ