आज दि 11 सप्टेंबर दुपारी 2 वाजता पालकमंत्र्यांनी भेट दिलेल्या साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रंगेहात पकडले गेलेत. अर्जित रजा मंजूर करण्यासाठी शिक्षकाकडून तब्बल २० हजारांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मुख्याध्यापक सोमनाथ भावले आणि त्याचा साथीदार गणेश कोथिंबिरे यांना अटक केली आहे. शाळा ही देशातील पहिली ISO प्रमाणित शाळा मानली जाते. मात्र, मुख्याध्यापकांच्या गैरकारभारामुळे शाळेची प्रतिमा डागाळली गेल्याची चर्चा आहे