इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात, विशेषतः कावनई व आसपासच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. कावनई येथील कपिलधारा रिसॉर्ट परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत पाळीव जनावरांवर हल्ले केल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. हॉटेल मालक ज्ञानेश्वर सिरसाट तसेच ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने पिंजरे बसवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता केली आहे.