जालना शहरातील अत्यंत महत्वाचे आणि महिलांच्या न्याय हक्कासाठी काम करणार्या भरोसा सेलमध्ये काम करणार्या महिला अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुनावणीसाठी आलेल्या पिडीत महिलांसाठी शौचायल आणि बाथरुमची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे महिलांची मोठी अडचण निर्माण होत आहे. सदरील भरोसा सेलमध्ये तात्काळ शौचालय आणि बाथरुमची सुविधा उपलब्ध करुन द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुखदेव चंद यांनी सोमवार दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वजाता दिलाय.