फोन न उचलल्याच्या कारणावरून टोळक्याने तरुणाला दांडक्याने मारहाण केली. तसेच 'आम्ही इथले भाई आहोत' अशी धमकी देत दहशत माजवली. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली.या प्रकरणी सौरभ संतोष पाटील (रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.