देवळी, पुलगाव येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात झाली आहे. आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते झाले असल्याचे आज 23 सप्टेंबर सकाळी करण्यात आल्याचे रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना एकाच ठिकाणी सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवणे हा आहे.