24 ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान वसंता ढोक 45 वर्ष हे त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीने पोलीस ठाणे वाडी हद्दीतील लोखंडे लेआउट जवळून जात असताना पल्सर दुचाकी चालक विकास वटी याने त्यांना धडक दिली. या धडकेत वसंता गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात दाखल केले असता आज दिनांक 28 ऑगस्ट ला सकाळी सव्वादहा वाजता त्यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी दीपक ढोक यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.