मलकापूर येथील यशोधाम पब्लिक स्कूल ची बस 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पिंप्रीगवळीकडे जात असताना ड्रायव्हरला अचानक चक्कर आली आणि बस रस्त्याच्या खाली उतरली.आमदार संजय गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून शालेय मुलांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला आणि सर्व मुलं सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली.या प्रसंगी शिवसेना नेते बाळाभाऊ नारखेडे, नितीन सुपे, ज्ञानेश्वर वाघ, आकाश डंबेलकर यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.