बुलढाणा शहरातील मच्छी लेआऊट येथील 20 वर्षीय युवती 23 ऑगस्ट रोजी हरविल्याची नोंद बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.बुलढाणा शहरातील मच्छी लेआऊट येथील रोषनी भट्टेश पाटील हि 20 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती 24 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता प्राप्त झाली आहे.