चाळीसगाव: चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमधील गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश बेलदार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सटा मटका चालवणाऱ्या किंगमेकरसोबत मद्यपान करतानाचे त्यांचे छायाचित्र समोर आल्याने पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात आली आहे. गोपनीय शाखेतील या कर्मचाऱ्याचे अवैध धंदे चालकांसोबत चांगले संबंध असल्याचा आरोपही होत आहे.