करमाड भागात माझी लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या प्रहार संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष वंदना म्हस्के यांची हकालपट्टी केल्याची माहिती प्रहार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष जे के जाधव यांनी सिडको येथे १७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दिली. वंदना म्हस्के यांना दीड वर्ष आधीच अध्यक्ष पदावरून काढण्यात आले होते. आता त्यांची हकालपट्टी केल्याची माहिती त्यांनी दिली.