बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून तातडीने आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील निवेदन बुधवार दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या मोर्चासाठी ट्रॅक्टर,बस,ट्रक,दुचाकी आदी वाहनांद्वारे मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असून,कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हाधिकार्यांकडे निवेदन दिले.