गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा वाहतुकीचा व प्रवासाचा त्रास लक्षात घेता रस्त्याच्या दुरुस्तीची कामे महानगरपालिका क्षेत्रात हाती घेण्यात आली आहे. अग्रवाल नाका,स्टार सिटी जूचंद्र,वामन ढाबा ते तिवरी फाटा नायगाव पूर्व,वसई ईस्ट वेस्ट ब्रिज ते मधुबन वसई पूर्व येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून कामाची गती गुणवत्ता तपासून तातडीने दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.