एक ५५ वर्षीय इसम सायंकाळच्या सुमारास आपल्या घरी हजर असताना २९ वर्षीय युवक त्याच्याकडे आला व त्याला मी तुझी गर्मी उतरवतो असे बोलला. त्यावर फिर्यादीने त्याला मी काय केले असे विचारणा केली असता त्याने तू माझ्या शेतात पाणी का टाकले असे म्हणून थापड बुक्क्यांसह दगडाने मारून जखमी केल्याची घटना घडली. घटनेतील अन्य २ आरोपींनी तिथे येऊन फिर्यादीला ढकल ढुकल करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.