अणदूर तलाव १००% भरला; कुंभी नदीकाठी सतर्कतेचा इशारा.गगनबावडा तालुक्यातील अणदूर लघुपाटबंधारे तलाव आज मंगळवार, २४ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे कुंभी नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे नदीकाठी वसलेल्या गावांतील नागरिकांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा व सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.