धुळे तालुक्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी जळगाव येथे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना भेटून जलजीवन मिशन अंतर्गत १८ गावांच्या मंजूर पाणीपुरवठा योजनांचे कार्यारंभ आदेश तातडीने देण्याची मागणी केली. प्रतीपाडा, खंडलाय बु., वडणे, पुरमेपाडा आदी गावांची निविदा प्रक्रिया पूर्ण असूनही आदेश न मिळाल्याने कामे रखडली आहेत. मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकर निर्णयाचे आश्वासन दिले असून, आदेश मिळाल्यानंतर १८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.