कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि दोन्ही धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती सांगली शहर पुराच्या छायेखाली येत असताना पावसाने उघडीत दिली सांगलीतील कृष्णा नदीने आपली इशारा पातळी ओलांडली होती त्यामुळे सांगली शहरातील काही सखल भागात पुराचे पाणी दाखल झाले होते महापालिका आणि जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून अनेक कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते पावसाने उघडीप दिल्यानंत