आज शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. बन यांनी म्हटले आहे की, औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. मविआच्या नेत्यांना संपर्क केला की संजय राऊतांची चिडचिड वाढते आणि महाराष्ट्रातील मविआची पळताभुई थोडी होणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस यांची चाणाक्यगिरी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसून आली, त्यामुळेच संजय राऊत घाबरले आहेत, असे बन यांनी म्हटले.