मोखाडा तालुक्यातील रामवाडी येथे रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमास मोखाडा पंचायत समिती उपसभापतींनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री रामांचे मंदिरात दर्शन घेतले. देवस्थान कमिटीच्या वतीने पंचायत समिती उपसभापतींचा स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.