जळगाव शहरातील लक्ष्मी नगर परिसरात राहणारा ३५ वर्षीय तरुण अंकुश सायसराव गुट्टे हा बेपत्ता झाला आहे. शनिवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता तो घरात कोणालाही काही न सांगता निघून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. या बाबत सायंकाळी ६ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.