खामगाव येथील शेतकरी प्रफुल नेरकर यांनी बँकेच्या वाढत्या कर्जाच्या मानसिक तणावातून आत्महत्या केली होती. दरम्यान आज शरीरसिंग ठाकूर यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले तसेच शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना राबविण्यासाठी आणि कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी आवश्यक मदत करावी असे आदेश एसडीओ आणि तहसीलदार यांना दिले