मुखेड तालुक्यातील शिरूर (दबडे) येथील २० वर्षीय मूकबधीर तरुणीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमास दि. १५ एप्रिल रोजी मुखेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तालुक्यातील शिरूर (दबडे) येथे दि.१२ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १:०० वाजता पीडित मुलीच्या घरी दबडे (शिरुर) येथे आरोपी हनुमंत बापूराव भद्रे याने तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुखेड पोलीस