बार्शी तालुक्यातील उपळे दु. शिवारातून एका शेतकऱ्याचा १ लाख २५ रुपयांचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याने 15 ऑगस्ट रोजी रात्री 7.30 ते 9.00 च्या दरम्यान ही चोरी केली आहे. याप्रकरणी हणमंत श्रीरंग साठे यांनी २४ ऑगस्ट सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चोरट्यांना पकडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.