चिखली शहर आठवडी बाजारात एका 83 वर्षीय वृद्धाची सोन्याची अंगठी लुटणाऱ्या गुन्हेगाराला चिखली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली. चिखली पोलिसांच्या या त्वरित कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.दगडू विठोबा सोळंकी (वय 83, रा. चांधाई, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांना 25 ऑगस्ट 2025 रोजी बाजारात एका अनोळखी व्यक्तीने नातेवाईक असल्याचे भासवून त्यांच्या हातातील 5 ग्रॅम वजनाची, अंदाजे 30 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लुटली.