गुन्हे शाखा युनिट वन चे पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी 22 एप्रिल ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी करणाऱ्या कुख्यात दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून सोन्याचे दागिने व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी प्रताप नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली आहे.