राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज धुळे जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक कॅथ लॅबचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले. राज्यस्तरावर जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारची ही पहिलीच कॅथ लॅब ठरली आहे.